सूचना : समाज कल्याण विभागांतर्गत ५% दिव्यांग शेष निधी योजनांसाठी अर्जाची अंतिम तारीख 15 जानेवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
🔴
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ जानेवारी २०२६
नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे...
01
दिव्यांगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थीची तपासणी करून त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे.
02
तपासणी पश्चात पुढील उपचाराची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनांद्वारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
03
सर्व पात्र दिव्यांग लाभार्थींना 'स्वावलंबन कार्ड' उपलब्ध करून देणे.
04
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी 100% करून ती संकेतस्थळावर online उपलब्ध करणे.