संक्षिप्त माहिती :
1) SAKSHAM पोर्टलवर www.sakshamparbhani.in या लिंकवर अर्ज सादर करणे अनिवार्य राहील. प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
2) पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत अनिवार्य राहील.
3) स्वावलंबन पोर्टल द्वारे निर्गमीत झालेले वैद्यकीय मंडळाचे UDID असलेले प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे. (40% किंवा त्यापेक्षा जास्त) याव्यतिरिक्त जुने दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत तसेच दिव्यांगत्वाची टक्केवारी ही 40% पेक्षा कमी असलेले अर्ज देखील ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.ज्यामुलांचे UDID प्रमाणपत्र निघत नाही त्यांचे शासकीय वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र सोबत जोडणे अनिवार्य राहील.
4) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या अंतर्गत कौशल्य विकास प्राप्त कोर्सवर आधारित प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र अनिवार्य.
5) जन्म तारखेचा पुरावाम्हणून म्हणून जन्म प्रमाणपत्र/आधार/तत्सम सोबत जोडणे अनिवार्य राहील.
6) वयाची मर्यादा ही कमीत कमी वय 18 ते 50 वर्षे यांनी अर्ज करावेत. त्यापेक्षा अधिक वयाचे अर्ज हे गृहीत धरण्यात येणार नाहीत व असे अर्ज सादर केल्यास ते अपात्र ठरतील.
7) ग्रामीण भागातील रहिवासी असलेबाबतचे ग्राम पंचायत अधिकारी/तहसीलदार यांचे प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडणे अनिवार्य राहील.
8) लाभार्थी अर्ज हे उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेपेक्षा जास्त आल्यास पात्र लाभार्थ्यांची निवड ही दिव्यांग टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने राहील (उदा.100% ते 40% पर्यंत)
9) यापूर्वी अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतला नाही. (संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व ग्राम पंचायत अधिकारी यांचे स्वतंत्र प्रमाणपत्र जोडणे)
10) रेशन कार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक.
11) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न किमान १,००,०००/- पर्यंत असावे. (तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र आवश्यक)
12) अर्जदाराचे IFSC कोड प्राप्त असलेले राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक.
13) अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्रे अर्जदाराने स्वहस्ताक्षरीत (Self Attested) असणे आवश्यक.
14) वरील प्रमाणे कागदपत्रे सक्षम पोर्टलवर अपलोड करुन सर्व कागदपत्रे सह परिपूर्ण प्रस्ताव दि. 15.03.2026 पूर्वि सादर करणे अनिवार्य राहील.
वयोगट : 18 ते 50 वर्षे
प्रकाशन दिनांक : 21/02/2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15/03/2026
प्रकाशित करणारी संस्था : परभणी जिल्हा परिषद
दिव्यांग प्रकार टक्केवारी : 41%% 40%% 42%% 43%% 44%% 45%% 46%% 47%% 48%% 49%% 50%% 51%% 52%% 53%% 54%% 55%% 56%% 57%% 58%% 59%% 60%% 61%% 62%% 63%% 64%% 65%% 66%% 67%% 68%% 69%% 70%% 71%% 72%% 73%% 74%% 75%% 76%% 77%% 78%% 79%% 80%% 81%% 82%% 83%% 84%% 85%% 86%% 87%% 88%% 89%% 90%% 91%% 92%% 93%% 94%% 95%% 96%% 97%% 98%% 99%% 100%%
दिव्यांग प्रकार : २) अंशतः अंध (Low Vision) १) पूर्णतः अंध (Blindness) ३) कर्णबधीर (Hearing Impairment) ४) वाचा दोष (Speech and Language Disability) ५) अस्थिव्यंग (Locomotor Disability) ६) मानसिक आजार (Mental Illness) ७) अध्ययन अक्षम (Learning Disability) ८) मेंदूचा पक्षाघात (Cerebral Palsy) ९) स्वमग्न (Autism) १०) बहुविकलांग (Multiple Disability) ११) कुष्ठरोग (Leprosy Cured Persons) १२) बुटकेपणा (Dwarfism) १३) बौद्धिक अक्षमता (Intellectual Disability) १४) माशपेशीय क्षरण (Muscular Disability) १५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार (chorionic Neurological Conditions) १६) मल्टिपल स्क्लेरोसिस(Multiple sclerosis) १७) थॅलेसिमिया (Thalassemia) १८) अधिक रक्तस्त्राव (Hemophilia) १९) सिकल सेल (Sickle Cell Disease) २०) अॅसिड अटॅक (Acid Attack Victim) २१) कंपवात रोग (Parkinson's Disease)